मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण आजपासून

0
264

महाराष्ट्र, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला वेळ संपला आहे त्यामुळे आंदोलनाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम आज संपलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

त्याचबरोबर, प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार पुढची भुमिका काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही, त्यांनीच वेळ घेतलेला आहे. चाळीस दिवसाचा आणि समाजाने मुख्यमंत्र्यांच्या सन्मान ठेवला आहे एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते, वेळ त्यांनी स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ मिळू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.