मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषण; म्हणाले आता पर्याय नाही….

0
56

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : मराठा आरक्षणासाठी मी जो मुद्दा मांडला आहे तो बरोबर आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे हीच मागणी घेऊन जरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत. सर्व मराठा नेत्यांना विनंती आहे विशेष अधिवेशन घेण्याशिवाय पर्याय नाही. मी 5 दिवसापासून बार्शीत आंदोलन करतोय मात्र 288 पैकी मराठा आरक्षणा संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी संदर्भात अद्याप एक आमदार बोलला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे कोणीही धाडस करत नाही. मात्र त्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून मी सुरुवात केली, असं बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत म्हणालेत.

मनोज जरांगे पाटील यांचा जो मुद्दा आहे तोच माझाही आहे. सनदशीर मार्गाने चालू आहे. आरक्षण जर मिळवायचा असेल तर विधानसभेत अधिवेशन घ्यावे लागेल. अन्यथा विधिज्ञ उभा करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल. याशिवाय मराठा आरक्षणासंदर्भात दुसरा पर्याय नाही. हाच मुद्दा जरांगे पाटलांच्या लक्षात आला नसेल. जरांगे पाटील जर म्हणले असतील अधिवेशन घ्या तर आनंदाची बाब आहे. त्यामुळे जर त्यांची माझी भूमिका ही एक झाली तर आनंदाची बाब आहे, असं राजेंद्र राऊतांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सगळ्यानी योगदान दिले आहे. त्यांनी तिकडून द्यावे, मी इकडून देईल. मनोज जरांगे पाटील उपोषणाची लढाई लढतात तर मी ठिय्या आंदोलन करतो. सर्व आमदारांना विनंती करतो कारण त्यांनाही उद्या मराठा समाजाचे मतदान घ्यायचे आहे. आमदारांनी पत्र द्यावीत. सरकारवर दबाव वाढवल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही, असं मत विशेष अधिवेशनाबाबत राजेंद्र राऊत यांनी मांडलं आहे.

विरोधी पक्ष सर्व गोष्टींवर आंदोलन करतात मात्र याबाबतीत भूमिका घेत नाही. विरोधी पक्षाने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचं का नाही यासाठी अधिवेशनाची मागणी का करत नाही? त्यावेळेस कळेल मराठा आरक्षणाला सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे का विरोधकांचा आहे. चाळीस वर्षाचा प्रश्न आहे तो कुठेतरी निघाली काढा. लोकसभा निवडणूक झाल्या आता विधानसभेच्या निवडणुका ही पाच वर्षानंतर येणार आहेत. उद्या जर मतदान केलं दुसरे निवडून आले ते तरी देणार आहेत का..?, असं राऊत म्हणाले.