जालना, दि. २५ (पीसीबी) – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मराठा आंदोलना पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.
जरांगेंचा फडणवीसांवर आरोप-
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस माझं एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत, असा खळबळजनक आरोप जरांगेंनी केलाय.
“मला सलाईनमधून विष देण्याचा विचार”-
मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न आहे, असंही जरांगे म्हणालेत.
मी आज तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का? मी सागर बंगल्यावर येतो, असं जरांगे म्हणालेत.
माझा त्यांनी बळी घेऊन दाखवावा. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही घेणारच. मी 10 टक्के आरक्षणाला हात लावणार नाही, असं देखील जरांगे म्हणाले.











































