मनोज जरांगेंना अनिल बोंडेंकडून कुत्र्याची उपमा

0
124


दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) यवतमाळ : “खोट नॅरेटीव्ह आपल्याला खोडणं आवश्यक आहे. गैरसमज पसरवणारा पसरवणारच आहे. फेक नॅरेटीव्ह फेक नॅरेटीव्ह करुन रडत बसण्यात अर्थ नाही. त्यांना खोट बोलण्याची सवय पडलीये ते खोट बोलणारच आहेत. आता ते एकटे खोट बोलणार नाहीत. त्यांनी आता अंगावर कुत्रे सोडले आहेत. एक श्याम मानवच्या रुपात सोडला की देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) वाईट-वाईट बोल. एक मनोज जरांगे (Manoj Jarange) सारखा सोडला”, असे भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले. यवतमाळ मध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.

तोही 83 वर्षांचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता
अनिल बोंडे म्हणाले, मनोज जरांगेला मी विचारतो अरे बाबा मराठ्याच आरक्षण, मराठ्याच आरक्षण करतो. आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते? यशवंतराव चव्हाण होते,वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण होते. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण होते. ज्याच्या सांगण्यावर तू बोलतोय. तोही 83 वर्षांचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता. तेव्हा शालिनीताई मराठ्याच आरक्षण मागत होत्या. तेव्हा काय झालं? शालिनीताई पाटलांच्या वेळेला मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही.