मुंबई मोर्चाच्या निमित्ताने शहरातील मराठ्यांची तयारी
पीसीबी दि . २६ मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या ओबीसी मधून मागणीसाठी मुंबई आझाद आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. या मुंबईमधील होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती योध्दा जरांगे पाटील लाखो मराठ्यांना घेऊन दिनांक २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे निघणार आहेत. जरांगेचा हा मुंबई दौरा अंतरवाली सराटी येथून सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर पोहोचेल व पुढे मार्गस्थ होऊन चाकण तळेगाव मार्गे मुंबईकडे रवाना होईल.
तरी जरांगे पाटील यांच्या या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघणाऱ्या मुंबई दौऱ्यात लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
यावेळी या मुंबई दौऱ्यात सहभागी होण्यासाठी तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड मधील मराठा समाज एकवटला आहे.
या मुंबई दौऱ्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड मधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची आज शहरात आकुर्डी येथील खंडोबा मंदिर हॉल येथे नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीला शहरातील विविध भागातून वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे मराठे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
या बैठकीत मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने अनेक नियोजनावर चर्चा झाली तसेच उपस्थितांनी आपापली मते मांडली.
या मुंबई दौऱ्याकरता पिंपरी चिंचवड मधील मराठा बांधव एकत्रितपणे दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी भक्ती शक्ती चौक निगडी येथे जमतील व पुढे तळेगावच्या दिशेने मुंबईकरता मार्गस्थ होतील असे यावेळी ठरविण्यात आले.
तसेच मुंबई दौऱ्याच्या प्रसिद्धीसाठी शहरातील विविध भागात एक होर्डिंग्ज तसेच पत्रके वाटून जन जागृती करण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी शहरातील सार्वजनिक गणपती मंडळांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार द्वारे विनंती करून आपापल्या मंडळांपुढे मुंबई दौऱ्याचे फ्लेक्स तसेच माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी काही उपस्थितीतांनी मुंबई दौऱ्यासाठी विविध प्रकारची मदत करणार असल्याचे जाहीर केले.
या नियोजन बैठकीत शहरातील सर्व मराठा बांधवांनी संपूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी या नियोजन बैठकीस सतीश काळे वैभव जाधव श्रीमंत जगताप जीवन बोराडे मारुती भापकर अरुण पवार सचिन काळभोर धनाजी येळकर आबासाहेब ढवळे नकुल भोईर अभिषेक म्हसे विनोद घोडके श्याम पाटील रवींद्र इंगवले अशोक सातपुते गणेश अवताडे गणेश देवराम प्रवीण कदम वसंत पाटील सिद्दीक शेख रावसाहेब गंगाधरे दिलीप गावडे यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.