मनोज जरांगेंचे रेकॉर्ड, पहाटे चारच्या सभेलाही तुफान गर्दी

0
254

करमाळा, दि. १६ (पीसीबी) -आज पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली आहे. काल (बुधवारी) संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या सभेला पोहोचण्यासाठी जरांगे यांना पहाटेचे चार वाजले. तरी देखील थंडीमध्ये कुडकुडत हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली.

मनोज जरांगे यांच्या सभेसाठा काल दुपारपासून मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरूवात झाली होती. अनेक भागातून मराठा बांधव जमायला सुरूवात झाली होती. करमाळा येथील वांगी हे गाव उजनीच्या बॅक वॉटर वरती आहे. कडाक्याची थंडी या भागामध्ये जाणवते. इंदापुर येथील लोकही या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखाच्या आसपास लोक जमले होते. मात्र, जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.

त्यांना पोहोचायला उशीर झाला मात्र, येथे जमलेल्यांनी मनोज जरांगे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर ४ वाजता सभा पार पडली. ४ ते ५ मिनीटे ते सभेत बोलले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहिलं. तुमचं जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

जरांगे-पाटील यांच्या उद्या सांगली जिल्ह्यात तीन सभा
मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे लक्ष वेधून घेणारे मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी (ता. १७) सांगली जिल्ह्यात तीन सभा घेणार आहेत. मराठवाड्यात त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांचा पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे. त्यांच्या दौऱ्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यांनी राज्य सरकारला दुसऱ्यांदा मुदतवाढ देताना २४ डिसेंबरपर्यत राज्य सरकारला निर्णयासाठी मुदत दिली आहे. मनोज जरांगे-पाटील यांचा हा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे