मनोज जरांगेंचा इशारा दोन दिवसांत आरक्षणाचं काही झालं नाही, तर आमची पुढची दिशा ठरणार’

0
201

परभणी, दि. २२ (पीसीबी) – ‘एका शब्दावर एक-एक तास चर्चा झाली. तुमच्याच शब्दावर तुम्ही अजून टाइम बाऊंड दिला नाही. सरकार नोटिसा देऊन आमचं आंदोलन दडपू शकत नाही. 24 डिसेंबरचा शब्द त्यांनी दिलेला आहे. आता त्यांनी 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावे. दोन दिवसांत आरक्षणाचं काही झालं नाही, तर आमची पुढची दिशा ठरणार’, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. ‘मराठे आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झालं’, असे जरांगे-पाटील यांनी परभणीच्या सेलूमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा दिलेला अल्टिमेटम आता दोन दिवसांत संपत आहे. त्यावर सरकारने जरांगे पाटलांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटील राज्यभर दौरे करत ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आज शुक्रवारी ते परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला.