मनुस्मृती दहनाचे प्रसंग शिल्प भीमसृष्टीमध्ये उभारण्याची मराठा सेवा संघाची मागणी

0
53

दि.25 (पीसीबी)  – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची प्रसंग मालिका भीमसृष्टी मधून साकारली आहे मात्र त्यातून मनुस्मृती दहनाच्या प्रसंग वगळण्यात आला आहे. तो त्वरित येथे बसवावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवा संघाचे पिंपरी – चिंचवड शहराचे मार्गदर्शक ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. चंद्रकांत इंदलकर व उपायुक्त अण्णा बोदाडे यांना देखील निवेदनाच्या प्रती पाठविलेल्या आहेत.
एच .ए. कॉलनी पिंपरी येथील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. लक्ष्मण रानवडे म्हणाले की, महात्मा फुलेंनी भाकीत वर्तविले होते की, या देशातील लोक एक न एक दिवस हि जुलमी मनुस्मृतीचे होळी करतील ,त्यांचे हे वक्तव्य २५ डिसेंबर १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सोबत असलेल्या हजारो लोकांनी मनुस्मृती जाळून खरे केले . या त्यांच्या क्रांतिकारी कृतीचे शिल्प महापालिकेने चित्र समूहात समाविष्ट करावे . असे आव्हान करण्यात आले
या कार्यक्रमास ॲड. सुनील रानवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुरेश इंगळे , अध्यक्ष सुभाष देसाई , मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष प्रकाश बाबर , राघव होजगे , दिलीप वाघ , अण्णा भाऊ साठे सेवा संस्थाचे अध्यक्ष गुलाबराव शेडगे , ऑल इंडिया जमात -ए- सलमानी ट्रस्ट चे प्रदेश सचिव जमील भाई शेख , चांद शेख , आदी कार्यकर्ते उपस्थित होते .