मनी लॉड्रिंगची रक्कम खात्यावर आल्याचे सांगून 12 लाख 75 हजारांची फसवणूक

0
69

भोसरी, दि. 9 (प्रतिनिधी)
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – मानवी तस्करी प्रकरणातील मनी लॉड्रिंगची रक्कम चुकून तुमच्या बँक खात्यावर आली असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून 12 लाख 75 हजार 569 रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 मे ते 24 जून या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडली.

8035723396 क्रमांकावरून बोलणारा राजीव गुप्ता, 7839861081 क्रमांकावरून बोलणारा दिनेश कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोशी प्राधिकरण येथील 34 वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीशी संपर्क करून मनी लॉड्रिंगची रक्कम तुमच्या बँक खात्यावर आली असल्याचे सांगितले. त्यानंतर टेलिग्रामवर एक ग्रुप बनवून त्यावरून फिर्यादीला फोन करून मानवी तस्करीसाठी पाठवलेली मनी लॉड्रिंगची रक्कम तुमच्या खात्यावर आली असल्याचे सांगितले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांवर एकूण 12 लाख 75 हजार 569 रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.