पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिका-यांच्या नियुक्त्या अमित ठाकरे यांनी केल्या आहेत. 12 जणांवर विविध जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या विद्यार्थी सेनेच्या शहर सचिवपदी अक्षय नाळे, भोसरी विधानसभेच्या उपशहराध्यक्षपदी प्रतिक शिंदे, पिंपरी विधानसभेच्या उपशहराध्यक्षपदी ओंकार पाटोळे, आकाश लांडगे, चिंचवड विधानसभेच्या उपशहराध्यक्षपदी विकास कदम, सिद्धेश सीनकवडे, भोसरीच्या विभाग अध्यक्षपदी मयुर हजारे, पिंपरी सुमित कलापुरे, चिंचवड आकाश पांचाळ, भोसरीच्या विभाग सचिवपदी अक्षय खामकर, चिंचवड अनिकेत बलकवडे, पिंपरी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, अनिकेत प्रभु उपस्थित होते.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी झपाटून काम करतील अशी अपेक्षा अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.