मनसेच्या मागणीला मोठे यश, महापालिका भवनात दररोज वाजणार राष्ट्रगीत

0
195

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना वाढावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिक हा काम करत असतो. त्यामुळेच सतत पाठपुरावा करत असलेल्या कामाला मोठे यश आले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य भावनात व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दररोज सकाळी दहा वाजता ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत वाजवले जाणारा आहे. प्रशासकीय कार्यालयांमध्ये असा उपक्रम चालू करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरणार आहे अशी माहिती मनसेच्या कामगार कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष रुपेश पटेकर यांनी दिली.

यावेळी मनसेचे नेते गणेश सातपुते, शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, उपशहराध्यक्ष राजू सावळे, उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, महिला शहरसचिव सीमा बेलापूरकर, महिला उपशहराध्यक्ष संगीता देशमुख, महिला उपशहराध्यक्ष अनिता पांचाळ, वाहतूक सेना शहराध्यक्ष सुशांत साळवी, वाहतूक सेना उपशहराध्यक्ष नितीन सूर्यवंशी, महानगरपालिका कर्मचारी सेना उपशहराध्यक्ष प्रफुल्ल कसबे,

विद्यार्थी सेना शहर संघटिका श्रद्धा देशमुख इत्यादी उपस्थीत होते.
“शासकिय कार्यालयात दररोज राष्ट्रगीताची कल्पना पटेकर यांना सुचने हि कौतुकास्पद बाब आहे. आयुक्तांकडे पाठपुरावा करून त्यांनी ही गोष्ट मंजूर करून घेतली हिच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे. खर तर पटेकर हे महापालिका निवडणूक लढवणार नाही परंतू त्यांनी निवडणूक लढवावी असे मला वाटते. आता राष्ट्रगीत महाराष्ट्रातील सर्व शासकिय कार्यालयात वाजवावे हा आमचा अजेंडा असणार आहे. एक वर्षांनी महापालिकेने मागणी मान्य केली त्यामुळे आयुक्तांचे अभिनंदन करतो. महापालिका निवडणुकी संदर्भात येणाऱ्या काळात मनसे भूमिका जाहीर करेल” असे मनसेचे राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते म्हणाले.

पटेकर म्हणाले कि, गेली एक वर्ष झाले महापालिका कामगार कर्मचारी सेना महानगरपालिकेत दररोज राष्ट्रगीत वाजवले जावे यासाठी सतत प्रयत्न करत होती. जयपूर, भोपाळ व गुवाहाटी येथील महापालिकेत दररोज राष्ट्रगीत वाजवले जाते याचे उदाहरणे आयुक्तांना सांगत होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून आयुक्त राजेश पाटील यांनी मागणी मान्य केली असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट पासून दररोज महापालिका भवनात व क्षेत्रीय कार्यालयामध्ये राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.

राष्ट्रगीत हे आपल्या  देशाच्या इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे गीत आहे.कोणत्याही कार्यालयात राष्ट्रगीतापेक्षा मोठी सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक भावना असू शकत नाही. यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी ,अधिकारी यांना शिस्त लागून प्रत्येक जण सकारात्मक ऊर्जा घेऊन काम करेल व कर्मचारी वेळेवर कार्यालयात जमतील असेही पटेकर म्हणाले.