मनपाच्या नागरवस्ती विभागाच्या विविध योजना त्वरीत राबविण्याची मागणी ….. सौ आशा शेंडगे धायगुडे

0
254

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. या योजनांमध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजना इ १० व इ १२ वी च्या गुणवंत विध्यार्थांसाठीची योजना, अपंगासाठी योजना, परदेशात शिक्षणासाठीची योजना, इत्यादी अशा अनेक योजना आपण विद्यार्थांसाठी तसेच नागरीकांसाठी राबवत असतो. सध्यास्थिती मध्ये सर्व शालेय विध्यार्थांचे निकाल लागले आहेत. परंतू सध्या सन २०२४ या वर्षाची लोकसभा निवडणुकीची आचारसहिता चालू होती त्याच बरोबर विधानसभा नोव्हेंबर २०२४ मध्ये येवू घेतल्या आहेत. पुन्हा विधानसभेची आचारसंहिता या सर्व प्रक्रियेत अवघे ३ ते ४ महिने आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला योजना राबविण्यासाठी मिळणार आहे असे त्या म्हणाल्या.

दर वर्षी या सर्व कल्याणकारी योजनांचा मोबदला मिळण्यासाठी नागरिकांना विद्यार्थ्याना वेठीस धरले जाते.जेव्हा विद्यार्थींना सदर रक्कमेची आवश्यक्ता असते त्याच वेळेत त्यांना मिळणे आपेक्षिक आहे.परंतु तसे हो ताना दिसत नाही हे दुरदैव आहे.

सर्व बाबींचा सारासार विचार करता आपण लोकसभा निवडणूकीची आचारसहिता संपताच मनपाच्या विविध योजनांचे अर्ज नागरीकांपर्यंत पोहचवावेत. सदर योजनांचे सर्व अर्ज नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी लागणारी सर्व पूर्व तयारी जसे की अर्जांची छपाई, अटी शर्ती इत्यादी आपण त्वरीत करून घ्यावी अशी मागणी यावेळी शेंडगे यांनी केली.