मध्यस्ती केली म्हणून एकावर खुनी हल्ला

0
235

चाकण, दि. २९ (पीसीबी) -रस्त्यावर सुरु असणारे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याने भांडणा-या चौघांनी मध्यस्थी करणा-या व्यक्तीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. ही घटना चाकण येथे शनिवारी (दि.27) रात्री सव्वा अकरा वाजता घडली.

महारुद्र शिवबसप्पा शिरगावी (वय 38, रा. चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारूती रमेश थिगळे, विशाल लक्ष्मण चौधरी, योगेश काशीनाथ थिगळे, (सर्व राहणार खेड), माही रुपेश शिंदे (रा. चाकण) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे चाकण येथील चक्रेश्वर रोडवरील एका हॉटेल समोर हातात दारुच्या बाटल्या घेऊन भांडण करत होते. यावेळी फिर्यादी तेथून जात होते. काही लोक आपसात भांडण करत असल्याचे पाहून फिर्यादी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरोपींनी फिर्यादीलाच लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तर मारूती याने दारुची काचेची बॉटल फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याच्या हेतूने गाडीतील लोखंडी साहित्याने हातावर, पायावर व डोक्यात तसेच तोंडावर मारण्यात आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.