मध्यरात्री कंगना यांच्या घरी जावून रणबीर याने अभिनेत्रीकडे नको ती मागणी केली…

0
112

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नेहमी वादाचा मुकूट डोक्यावर घेवून मिरवणाऱ्या कंगना आता एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहे. सध्या चर्चेत असलेलं ट्विट हे कंगना रनौत आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या संबंधित आहे. कंगना – रणबीर संबंधित ट्विट करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता कमाल आर खान म्हणजे केआरके आहे. ट्विटमध्ये केआरके याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे मध्यरात्री कंगना यांच्या घरी जावून रणबीर याने अभिनेत्रीकडे नको ती मागणी केली… असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केआरके ट्विट करत म्हणाला, ‘कंगना रनौतने अधिकृत वक्तव्य केलं होतं की, रणबीर कूपर अभिनेत्रीच्या घरी मध्यरात्री पोहोचला होता. अभिनेत्याने कंगनाकडे शारीरिक संबंधांसाठी विनंती केली. पण कंगनाने स्पष्ट नकार दिला. ज्यावर रणबीर अभिनेत्रीला लेस्बो म्हणाला आणि निराश होवून निघून गेला…’, केआरकेच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

ट्विटवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिय देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आणखी एक कुलविंदरची गरज आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘राजकारणात कशी लोकं आली आहेत?’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हे खरंच सत्य आह … ‘ सध्या सर्वत्र ट्विटची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, केआरके कायम बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावर ट्विट करत असतो. ज्यामुळे केआरके अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. आता देखील केआरके केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आहे.

कंगना रनौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर कंगना यांनी राजकारणाकडे स्वतःचा मोर्चा वळवला. कंगना यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. आता कंगना राजकारण आणि बॉलिवूड दोन्ही क्षेत्रात अव्वल स्थानी आहेत.

कंगना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कंगना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.