मध्यप्रदेशात फक्त लाडली बहना योजनेचीच जादू चालली

0
310

भोपाळ, दि. ३ (पीसीबी) – मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष पुन्हा सरकार बनवण्याकडे दमदार वाटचाल करताना दिसत आहे. यंदा मध्य प्रदेशात बंपर मतदान झाले. या मतदानात महिलांचा वाटा लक्षणीय होता. 2018 मधील विधानसभा निवडणुकीत 75.63 टक्के मतदान झाले होते आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. आता त्यापेक्षा जास्त 76.55 टक्के मतदान झाले. त्यात महिलांनी शिवराजसिंह चौहान यांनी साथ दिली. शिवराज सरकारची ड्रीम योजना लाडली लक्ष्मी योजना आणि लाडली बहना योजनेची जादू चालली आणि काँग्रेसच्या गॅस सिलेंडर मोफतच्या आश्वासनाही मतदार बळी पडले नाही. यंदा सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजप 160 जागांवर आघाडी घेत पुन्हा सरकार बनवण्याकडे वाटचाल करत आहे.

मतमोजणीच्या कलानुसार 50 टक्के महिला भाजपबरोबर राहिल्या आहेत. महिलांना शिवराज सरकारने सुरु केलेली योजना लाडली लक्ष्मी आणि लाडली बहना योजना चांगलीच आवडली. लाडली बहना योजनेत भाजप सरकार महिलांना 1250 रुपये दर महिन्याला देत आहे. काँग्रेसने 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मतदारांनी शिवराजसिंह चौहान यांनाच साथ दिली. शिवराज सरकारने या योजनेचा निधी टप्पाटप्याने तीन हजार करण्याची घोषणा केली. काँग्रेसपेक्षा दुप्पट रक्कम आम्ही देत असल्याचा संदेश भाजपने दिला. यामुळे जनतेला काँग्रेसची नारी सम्मान योजना काही आवडली नाही.