मधुकर बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी शोकसभा

0
408

पिंपरी दि. २७ (पीसीबी) – शिवसेनेचे माजी नगरसेवक दिवंगत मधुकर धरमशी बाबर यांचे रविवारी (दि.24) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या (गुरुवारी) विविध संघटनांनी शोकसभेचे आयोजन केले आहे.

चिंचवड येथील हॉटेल बर्ड व्हॅली येथे गुरुवारी सायंकाळी चार वाजता शोकसभा होणार आहे. श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित, जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,अभिनव सोशल फाउंडेशन पिंपरी-चिंचवड ,राष्ट्रतेज तरुण मंडळ,गुरुदत्त सेवा मंडळ अष्टविनायक मित्र मंडळ ,संघर्ष मित्र मंडळ,शिवशंभो फाउंडेशन,स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान व मंडळ ,हिंदवी प्रतिष्ठान  शिवसेना शाखा काळभोर नगर मोहन नगर विद्यानगर,यशवंतराव चव्हाण स्मारक समिती अशा विविध संघटनांनी शोकसभेचे आयोजन केले आहे.