मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावाचा प्रयत्न करत असताना एक तरुणी दरीत

0
14

दि . ११ ( पीसीबी ) – पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर एक भयंकर घटना घडली आहे. राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर, अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावाचा प्रयत्न करत असताना एक तरुणीचा गंभीर अपघात झाला. तिला वाचवण्यासाठी वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम बोलावण्यात आली होती.

राजगड किल्ल्यावरील संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील या युवतीवर अचानक मधमाश्यांचा हल्ला झाला. बचावासाठी तरुणीने ४० फूट खोल दरीत उडी मारली.यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या मणक्यामध्ये फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला स्वतःला हालचाल करता येत नव्हती.या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तत्काळ बचाव मोहिम सुरू केली. किल्ल्याचा परिसर अत्यंत दुर्गम, उतारदार आणि अंधाराने भरलेला असल्यामुळे रेस्क्यू मोहिम आव्हानात्मक ठरली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि अडचणीच्या पायवाटींवरून हे रेस्क्यू करण्यात आलं. अखेर ८-९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला सुखरूप वाचवण्यात आलं.