मद्यपी रिक्षाचालकाने पोलिसांच्या वाहनाला उडवले

0
56

निगडी, दि. १८ (पीसीबी)

अजंठा नगर निगडी येथे एका मद्यापी रिक्षा चालकाने पोलिसांच्या व्हॅनला धडक दिली. हा अपघात रविवारी (दि. 17) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडला.

महादेव बळी वाघमारे (वय 25, रा. अजंठानगर, निगडी)असे गुन्हा दाखल झालेल्या मद्यपी रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आदिनाथ भागवत यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदिनाथ भागवत हे रात्रगस्त करत असताना. अजंठानगर येथे काही लोक थांबलेले दिसले. त्यामुळे भागवत यांनी त्यांच्या ताब्यातील पोलीस व्हॅन जमावाच्या दिशेने नेली. त्यावेळी तिथे आरोपी महादेव वाघमारे हा रिक्षा चालवत आला. त्याने त्याच्या ताब्यातील रिक्षाने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात महादेव वाघमारे जखमी झाला आहे. तसेच त्याने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.