मद्यपान करून पोलिसांना धक्काबुक्की; दोघांना अटक

0
170

सांगवी,दि. ४ (पीसीबी))

मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोघांना समजावून सांगत असलेल्या पोलिसांना मद्यपिंनी धक्काबुक्की केली. याबाबत पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास एम के चौक नवी सांगवी येथे घडली.

संजय अशोक साळवी (वय 60, रा. नवी सांगवी), योगेश मारुती पाटील (वय 41, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल मोराळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम के चौक नवी सांगवी येथून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल आला. मद्य प्राशन करून दोघेजण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याने सांगवी पोलीस त्यांना समजावून सांगत होते. त्यावेळी मद्यपान केलेल्या दोघांनी सांगवी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना सांगवी पोलीस ठाण्यात आणले. तिथे देखील आरोपींनी गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.