मताधिकार बजावण्यासाठी दिव्यांग नागरिकही पुढे! मदतीसाठी सरसावले निवडणूक विभागाचे कर्मचारी

0
177

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) मतदारांनी सकाळी सकाळीच मतदार केंद्रावर हजेरी लावून मतदानात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. या मतदानासाठी दोन्ही मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिसांचं लक्ष लागलं आहे. आज मतदान झाल्यावर येत्या 2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. दिव्यांग 12 हजार 313, 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे. सध्या मतदानाची रेलचेल दिसून येत आहेत.

मतदान धारकांनी केंद्रावर जाऊन मतदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य ती मदत केली जात आहे. अशातच संदीप रामचंद्र माळी हा युवक दिव्यांग असून पहिल्यांदाच मताधिकार बजावत होता. दिव्यांग असल्याकारणाने मतदान केंद्रात जाऊन मताधिकार बजावणे त्यास शक्य होत नव्हते. त्याला निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले..