मतदान सर्व श्रेष्ठ काम म्हणत ,सांगवीतील मजूर अड्ड्यावर शपथ देऊन, मतदान जनजागृती अभियान.

0
296

सांगवीतील मजूर अड्ड्यावर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थेच्या वतीने भितीपत्रके वाटून,शपथ देऊन कविता सादर करुन व आवाहन करून जागृती करण्यात आली. 17 व्या लोकसभेचा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अशिक्षित असणाऱ्या मजूर अड्ड्यावर जनजागृती करण्यात आली.यामध्ये आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर मतदान सर्व श्रेष्ठ काम, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आपलं मत लोकशाहीला मत.प्रलोभनांना बळी पडू नका .असे शर्टवर लिहून जोगदंड स्पीकर मधून मजूर कामगारांना मतदान करण्यासाठी नम्रपणे आवाहन करत होत.त्यांनी मतदान करण्याची शपथ दिली.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले की, आपली लोकशाही बळकत करण्यासाठी शासनाने दिलेल्या सुट्टीच्या दिवशी भटकंती न करता मतदान करण्याचे आवाहन करत होते. जाती-धर्माच्या नावावर मतदान न करता,आपल्या परिसराची व नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या सुशिक्षित मतदारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या मताची किंमत जनावरांच्या किमतीपेक्षा कमी करुन ते विकू नका .मताची किंमत पैसात करू नका असे आवाहन संस्थाअध्यक्ष विकास कुचेकर यांनी केले आहे.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार म्हणाले की आपण कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करा.आपल्या मताची किंमत पैशात करू नका .जेष्ट साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी अनेक नागरिकांना विधानसभा ,राज्यसभा ,लोकसभा,याची परीपूर्ण माहिती नसते अशा अशिक्षित मजूरांना आपली संस्था माहिती देऊन मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे याचा मला आनंद वाटतो.

राजु सावळे म्हणले कि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला मतदान करा सध्या उमेदवारची सर्व माहिती वेबसाईटवर दिलेली असते मतदान करण्यापुर्वी उमेदवाराची माहिती घेऊनच मतदान करण्याचे आव्हान केले. यावेळी स्लोगनवर घ्या मातृभूमीची आण ,करा मतदान. तुम हो महान करके मतदान .आपलं मत विकासाला मत .मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो .असे अनेक फलक नागरिकांच्या हातात दिसत होते.वेगवेगळ्या जनावरांची चित्र काढून त्यांची किमती लिहिलेले स्लोगन नागरिकांच्या हातात होते.कवी शरद शेजवळ यांनी मतदान जनजागृती वर आपली रचना सादर केली. प्रास्ताविक तानाजी एकोंडे यांनी केले तर आभार सुभाष चव्हाण यांनी मानवले

यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष आण्णा जोगदड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड ,दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण ,विकास शहाणे ,श्रीकांत चौगले, निलेश हंचाटे,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, पर्यावरण अभ्यासक तानाजी एकोंडे, सा.का.गणेश वाढेकर,प्रकाश वीर,प्रा.उमेश बोरसे ,राजू सावळे, ह.भ.प.शेळके महाराज, हास्य क्लबचे अध्यक्ष अँड प्रताप साबळे ,सरदार वल्लभाई पटेल प्रतिष्टानचे अध्यक्ष पंकज पाटील,डी.वाय पाटील काँलेजचे डिन प्रा.भाऊसाहेब लोंढे गुणवंत कामगार शंकर नानेकर, सत्ता प्रतिष्टानचे अध्यक्ष सौरभ शिंदे, कवी शरद शेजवळ, आत्माराम हारे, जयश्री गुमास्ते,राहूल शेंडगे, राजू कदम,रामराम दराडे,प्रा.महादेव रोकडे,ईश्वरलाल चौधरी,अरविंद सुर्वे, विकास कोरे,यांच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.