पिंपरी, दि. १४ – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशावरून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार मशाल मोर्चा (मतदान चोर,खुर्ची सोड) चे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरूवारी (दि. १४) सायंकाळी साडेसहा वाजता पिंपरीतील साई चौक येथुन सुरुवात होईल आणि पुडे शगुन चौक, पिंपरी बाजार पेठ मार्गे भाटनगर, पिंपरी कमानी च्या येथे समारोप होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, मा.नगरसेवक /मा.नगरसेविका, युवक, महिला, सेवादल, एनएसयुआय, इंटक, ब्लॉक, सर्व सेल, विभाग याचे अध्यक्ष /अध्यक्षा, पदाधिकारी व कार्यकर्ते आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा आपणा सर्वांचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे उजेडात आणले. भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, निवडणूक आयोगाच्या मदतीने,मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतचोरी करून, गैरमार्गाने सत्ता मिळवलेली आहे.कॉग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे.याची जाणीव मतदारांनाही झालेली आहे.