मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शपथ

0
18

थेरगाव, दि. १० – चिंचवड येथील पवना नदीघाट, थेरगाव येथील केजुबाई उद्यान, वाल्हेकरवाडी नदी घाट आणि डांगे चौक याठिकाणी छटपूजेचे आयोजन करण्यात होते या पूजेवेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप टीमच्या वतीने मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वीप समन्वयक अजिंक्य येळे आणि नोडल अधिकारी राजीव घुले यांच्या अधिपत्याखाली स्वीप टीमच्या वतीने मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या परिसरात मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

छटपूजेवेळी करण्यात आलेल्या जनजागृतीवेळी आस्था फाऊंडेशनचे अमित यादव, विजय गुप्ता, आकाश मिश्रा, शरद मिश्रा, संजू गुप्ता यांच्यासह २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप टीमचे प्रिन्स सिंह, दीपक एन्नावार, मनोज माचरे, गणेश लिंगडे, संजू भाट, अंकुश गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी “आम्ही मतदान करणार….” अशी मतदानाची शपथ देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.