मतदानवेळी ह्यांना फतवे लागतात आणि सत्ता गेली…; नितेश राणेंची उद्धव ठाकरे सडकून टीका

0
40

मुंबई, दि. 02 (पीसीबी) : “बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता-भगिनी आणि बांधवांची काळजी जिहाद हृदय सम्राट असलेल्या उद्धव ठाकरेच्या प्रवक्त्याला वाटणं हे हास्यास्पद आहे. ह्यांचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे निवडणून आले आहेत. निवडणुकीवेळी त्याने मुल्ला सोबत जेवढा वेळ घालवला त्यातला एक टक्का वेळ देऊळ आणि साधू संतांना दिला नाही. ह्याच्या पेक्षा नालायक कोणी नाही. हा गोधडित असताना RSS भाजप, हिंदू समाजाची सुरक्षा आणि काळजी घेत होते. जेवढी काळजी RSS घेत आहे, त्यातली एक टक्का देखील काळजी ह्याचा मालक करत नाही” अशा शब्दात भाजपचे कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

“मतदानवेळी ह्यांना फतवे लागतात आणि सत्ता गेली तसे आता ह्यांना भगवा आठवतो. आमचं सरकार बांगलादेशातील हिंदुंची काळजी घेत आहे. बांगलादेश मधील परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षा मोदींनी चांगल्या प्रकारे हाताळली. मोदी साहेबांमुळे जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे. भांडूपमध्ये बसून आंतराष्ट्रीय पातळीची चिंता करु नको. मुंबईला बांगलादेश करण्याचे कारस्थान ह्याचा मालक करत आहे. बांगलादेशींना आश्रय देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलय. या हिरव्या सापांना दूध पाजण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलय. त्या जिहादींना आवर अन्यथा एक दिवस ठेचून मारू” असे शब्द नितेश राणे यांनी वापरले.

“नरेंद्र मोदी काय चीज आहे हे राऊतने ओळखलेलं नाही. मोदींचं नाव घेतलं की, अनेक जिहादी अतिरेकी थरथर कापतात. ह्याचा अनुभव लवकर येईल. हा काँग्रेसच्या काळातील भारत नाही तर मोदींच्या काळातील हिंदुस्थान आहे. RSS सारख्या राष्ट्रभक्त संघटनेने काय करावं, हे जिहादी एजंटने आम्हाला सांगू नये” असं नितेश राणे म्हणाले.

“हिंदुंना सर्वात जास्त धोका जिहादी हृदय सम्राट उद्धव ठाकरेकडून आहे. उद्धव ठाकरे दुसरा दाऊद आहे. ह्याचा बंदोबस्त करा आणि मुंबई व महाराष्ट्र अतिरेकी मुक्त करा. पदासाठी लाचारी करणाऱ्यांनी दुसऱ्यांना पदाबाबतचे सल्ले देऊ नये. तुझा मालक कुठे कुठे मुजरा करत होता ते आम्हाला माहित आहे. तुझ्या उबाटा नावाच्या घराला पेटवलं आहेस तिकडे लक्ष दे. अधिवेशनानंतर तुझ्या सोबत किती आमदार राहतात ते बघ” अशी टीका नितेश राणे यांनी केली.