-असे प्रकार रोखण्याची जबाबदारी सरकारची.
पिंपरी दि. २१. – मणिपूर येथे तीन महिलांची विवस्त्र धिंड काढली व मुलीवरती सामूहिक बलात्काराच्या भीषण घटना घडल्या या मानवतेला काळिंबा फासणाऱ्या,लांछनास्पद घटनेचा जाहीर निषेध आज कष्टकरी संघर्ष महिला महासंघातर्फे करण्यात आला यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,माधुरी जलमुलवार,अलका पडवळ, सुजाता टेकाळे, श्यामला फुले, माया शेटे, गंगा पाटोळे,नंदा जाधव,सुनंदा वैरागे,सिता गायकवाड, महानंदा टोपे, योगिता बंग, वनिता सकट, मनीषा भागवत आदीसह कष्टकरी महिला बहुसंख्य उपस्थित होत्या .
मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यापासून जे घडत आहे ते अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहे, पूर्ण जगात देशाला आपली मान जगात खाली घालायला लावनाऱ्या या घटना आहेत ,महिलांना नग्न अवस्थेत फिरवण्याच्या घटनेने तर कळसच गाठला आहे, परस्त्री ती पर धर्मातील असू, शत्रू पक्षातील असेल तरीही आदर, सन्मान करायचा असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला याच भारत देशामध्ये मे महिन्यामध्ये आधुनिक काळात घडलेला नग्न अवस्थेत महिलांना फिरवून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले जातात यासारख्या दुर्दैवी घटना नाहीत . या घटनेमुळे आपल्या देशाची मान शरमेने खाली गेली आहे.
आम्ही प्रगतीच्या वाटेवर आहोत का अधोगतीच्या ? खरा हाच प्रश्न आज पडतो आहे. मनिपुर प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाने ही फटकारले आहे .येथील हिंसाचार आणि अशा घटना रोखण्यासाठी तेथील मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह व केंद्र सरकार अपयशी ठरलेले आहे.म्हणून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे . मणिपूरमधील पीडित भगिनी आणि बंधुसोबत आम्ही खंबीर आहोत आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा आम्ही जाहीर निषेध करतो. मणिपूरच्या शांततेसाठी कष्टकरी महिला सहभागी झाल्या.
येथील मैतेयी आणि कुकी समुदायातील संघर्ष कमी करून त्यांना एकोप्याने राहण्याच्या बाबतीमध्ये योग्य पावले उचलणे काळाची गरज आहे. अशा घटनांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत .