मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीची राज्यभर निदर्शने

0
351

पिंपरी, दि.२० (पीसीबी) – मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का मोहोल असे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.

मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात त्रिव निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम् आदमी पार्टीने केली आहे.

आंदोलनात अनुप शर्मा,स्मिता पवार,सीता ताई केंद्रे,चंद्रमनी जावळे, सोनाली झोल,सतीश नायर,अभिजित सूर्यवंशी,गोविंद माळी,वैजनाथ शिरसाठ, यशवंत कांबळे,अजय सिंग,सचिन पवार,माया सांगावे,प्रकाश हागवणे,बालाजी कांबळे, डॉ अमर डोंगरे,वहाब शेख,दत्तात्रय सांगावे, मीना जावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.