मटेरिअल खरेदी केले नाही म्हणून व्यावसायीकाच्या मशीन व गाडीची तोडफोड

0
627

भोसरी, दि. ०६ (पीसीबी) – माझ्याकडून मटेरिअल खरेदी का केले नाही म्हणून एका व्यावसायीकने दुसऱ्या व्यावसायीकाच्या मशीनची व गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.5) गुळवेवस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी शंभुलिंग भिमशा पाटील (वय 31 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अब्दुल बकी (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे भोसरीतील गुळवेवस्ती येथे भाग्यलक्ष्मी इंटरप्रायजेस आहे. फिर्यादी यांनी आरोपीकडून मटेरियल घेतले नाही, याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या कामगारांना दमदाटी केली. तसेच फिर्यादीच्या इंटरप्रायजेस येथे जाऊन सीएनसी मशीनची व चारचाकी गाडीची तोडफोड केलीय तसेच वजनकाटा व इतर सामानाचे ही नुकसान केले. यावरून आरोपीवर 7 लाख रुपयांच्या सामानाचे नुकसान केल्याचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.