मजुराच्या मृत्यू प्रकरणी सुपरवायजरवर गुन्हा दाखल

0
128

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी,

बांधकाम साईटवर मजुराचा मृत्यू प्रकरणी सुपरवायजर वरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 जुलै 2024 रोजी भोईरवाडी, मुळशी येथील 32 पाईन वूड ड्राईव्ह येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकिशन कांदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शहाजान शेख (वय 35 रा म्हाळूंगे) व सुपरवायजर अमीत शाताराम चव्हाण (वय 29 रा. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 पाईन वूड या साईटवर पाण्याच्या टाकीचे काम करत असताना 14 मजल्यावरून पडून मजूराचा मृत्यू झाला होता. बांधकाम साईटवर मजुरांसाठी सुरक्षा साहित्य न वापरल्या प्रकरणी हागुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.