मग तीनशे नाही तर पाचशे पार करुन दाखवा…

0
170

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – “जगात अमेरीका, चीन, रशिया सारखे देश महाशक्ती आहेत. त्याठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर होतात. तुम्हीपण स्वत:ला महाशक्ती मानत असाल तर त्यांच्याप्रमाणे तुम्हीही देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि मग तीनशे नाही तर पाचशे पार करुन दाखवा”, असे चॅलेंज खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला दिले आहे.

ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पतंप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या जाहिर सभांमध्ये भाजप (BJP) लोकसभा निवडणुकीत देशात तीनशे जागांचा आकडा पार करेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदींना ‘ईव्हीएम है तो सबकुछ मुमकिन है’ असे वाटत आहे.
त्यांचा ईव्हीएम वर विश्वास असेल पण आमचा नाही. दिल्लीमध्ये इंडिया आघाडी बैठकीत आम्ही तशी मागणी केली आहे. जरी त्यांना ईव्हीएमवरती निवडणुका घ्यायच्या असतील तर घेवू शकतात मात्र व्हीव्हीपॅट (VVPAT) ची स्लीप आमच्या हातता आली पाहिजे. आम्ही स्वत: ती पेटीत टाकणार आहे. शंभर टक्के व्हीव्हीपॅटवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत.

तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार नाही कारण त्यात तुमची हार होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. मोदी जगात भारतही महाशक्ती झाल्याचे सांगत आहेत. जगात अमेरीका, चीन, रशिया सारखे देश महाशक्ती आहेत. त्याठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर होतात. तुम्हीपण स्वत:ला महाशक्ती मानत असाल तर त्यांच्याप्रमाणे तुम्हीही देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि मग तीनशे नाही, तर पाचशे पार करुन दाखवा, असे चॅलेंज राऊत यांनी मोदी सरकारला दिले आहे.