मंदिरात निघालेल्या ज्येष्ठाचा मोबाईल हिसकावला

0
395

दिघी, दि. २९ (पीसीबी) – मंदिरात दर्शनासाठी पायी निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 24) सायंकाळी दिघी-आळंदी रोडवर घडली.

याप्रकरणी 61 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने गुरुवारी (दि. 28) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे साई मंदिर दिघी येथे दर्शनासाठी पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत होते. दिघी आळंदी रोडवर काळे तालेरा गोडाऊनच्या गेटजवळ आल्यांनतर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातून 15 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.