मंदिरात दर्शन घेण्यावरून एकास मारहाण; 14 जणांवर गुन्हा दाखल

0
211

रहाटणी, दि. २४ (पीसीबी) : समाज मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला 14 जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी क्षत्रिय घांची समाज मंदिराजवळ रहाटणी येथे घडली.

प्रकाश रूपचंद सोळंकी (वय 35, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार प्रकाश सरेश परिहार, रमेश गेहलोत, भवरलाल परिहार, दुर्गाराम परमार, जगदीश परिहार, जीवाराम परिहार, मनोज भाटी, मगनलाल भाटी, रमेश नकूम, दलपत भाटी, दौलाराम परिहार, प्रवीण राठोड, विशाल भाटी, महेंद्र राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश हे रहाटणी येथील क्षत्रिय घांची समाज मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रकाश परिहार याने तुमच्यासाठी या मंदिरात दर्शन बंद आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकत नाही, असे म्हणून फिर्यादींच्या शर्टची कॉलर पकडली. त्यांना खाली पाडून त्याच्याबरोबर असलेल्या अन्य आरोपींनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.