मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, एकनाथ खडसे यांच्यावर गिरीष महाजन यांची खरमरीत टीका..

0
310

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली तेव्हापासून ते भाजप नेत्यांच्या टिकेचे धनी झाले आहेत. भाजप नेते सापडेल त्या ठिकाणी त्यांची खिल्ली उडवत असतात. त्यादरम्यान राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेसाठी तिकीट दिलं आणि ते निवडून आले पण त्यानंतरही भाजपचे गिरीष महाजन त्यांच्यावर बोचरी टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
“एकनाथ खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली.” अशी त्यांची स्थिती झाली आहे अशी बोचरी टीका भाजपचे (BJP) गिरीष महाजन यांनी केली आहे. खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकारचं गेलं अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील विनोदाचा आधार घेत त्यांनी आमदार खडसेंवर टीका केली आहे. दरम्यान हे मी सोशल मीडियावर ऐकलं असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकामध्ये एकनाथ खडसे यांना भाजपने तिकीट न दिल्याने ते नाराज होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण त्यानंतर राष्ट्रवादीने आता त्यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी तिकीट दिलं होतं. त्यामध्ये ते विजयी झाले आणि आमदार झाले. यानंतर त्यांना आता फक्त आमदारकीवरच समाधान मानावे लागणार असल्याची बोचरी टीका भाजप नेत्यांकडून केली जात आहे.
आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेवर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला पण त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली की सरकार पडलं त्यामुळे त्यांची मंदिरात गेलं तर प्रसाद संपला आणि बाहेर आसं तर चप्पल चोरीला गेली अशी अवस्था झाली आहे अशी टीका केली जात आहे.