मंत्री भुमरेंच्या चालकाकडे हिबानामा मधून मिळालेली २,००० कोटींची जमीन

0
3

दि. ९ .(पीसीबी) – छत्रपती संभाजीनगर: शिवसेना नेते आणि खासदार संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख यांनी हिबानामा केलेल्या जमिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या भुमरेंच्या चालकाला आयकर विभागाची नोटीस देखील आली होती, त्यानंतर आता त्या हिबानामा केलेल्या जमिनी किंमत किती? हाच प्रश्न अनेकांना पडला आहे, या प्रकरणात तपास करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला देखील हा प्रश्न पडला आणि आर्थिक गुन्हे शाखेनं या जमिनीचा शासकीय मूल्य काढण्याबाबत एक पत्र महसूल विभागाला दिलं.

त्यानंतर महसूल विभागाने पहिल्यांदाच जावेद शेखच्या नावावर हिबानामाद्वारे मिळालेल्या जमिनीचा अधिकृत किंमत समोर आणली आहे. महसूल विभागाने आर्थिक गुन्हे शाखेला याबाबत दिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. त्या पत्रात या जमिनीची शासकीय मूल्यांकन 241 कोटी 69 लाख 51 हजार 408 रुपये असल्याचं म्हटलं आहे. तर याच जमिनीचा बाजार भावाचा विचार केल्यास अंदाजे 2 हजार कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जावेद शेखला आयकर विभागाची देखील नोटीस आलेली आहे. तर दुसरीकडे महसूल विभागाने देखील या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

सरकारला स्टॅम्प ड्युटी जवळपास 17 कोटी मिळाले असते
या जमिनीचा हिबानामा झाल्यानंतर शासनाचा महसूल कसा बुडाला यावर एक नजर टाकूया. या जमिनीची शासकीय मूल्यांकन 241 कोटी 69 लाख 51 हजार 408 रुपये याचे खरेदी खत झाले असते, तर सरकारला स्टॅम्प ड्युटी (दस्तावेज नोंदणी मुद्रांक शुल्क) जवळपास 17 कोटी मिळाले असते, तर महापालिका संरक्षण भिंत बांधणीसाठी एखादे कोट रुपये मिळाले असते. हिबानामा झाल्यानंतर शासनाचा इतका महसूल बुडाला आहे.

नेमकं प्रकरण काय?
हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजानं 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. तीन एकर जमिनीची किंमत 150 कोटी इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची जमीन सालार गंज कुटुंबाने हिबानामा म्हणून जावेद शेख यांना दिली. या जमिनीच्या चौकशीसाठी संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते. आठ जुलैला आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावले मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही अशी माहिती समोर येत आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागितल्याची चर्चा आहे.

हिबानामा म्हणजे नेमकं काय?
हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे.. ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता जमीन, घर, दागिने इ. दुसऱ्या व्यक्तीला निःस्वार्थपणे, म्हणजे कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण न करता, भेट स्वरूपात देतो. हिबा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ “भेट देणे” (Gift) असा होतो. विशेषतः मुस्लीम कायद्यात हिबा ही संकल्पना महत्त्वाची आहे, पण काही वेळा ती सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते. हिबानामा करण्याचे नियम काय सांगतात.