मंत्री अब्दूल सत्तार यांच्या घरावर दगडफेक, माफी नको राजीनामा द्या

0
202

मुंबई,दि.०७(पीसीबी) –  कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजीनामा द्या नसता राज्यात फिरु देणार नाही, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर त्यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चाल करुन गेले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सत्तारांच्या घरावर दगड फेकले, त्यांच्या निवासस्थानाच्या काचदेखील फोडल्या.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली असली तरी ‘माफी काफी नहीं हैं…’ असं म्हणत सत्तारांच्या थेट राजीनाम्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

सत्तारांचा राजीनामा घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नसल्याचं चव्हाण म्हणाल्या. सत्तारांना राज्यात आम्ही फिरु देणार नाहीत. त्यांनी दिल्लीची सेक्युरिटी आणावी, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना झोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असंही चव्हाण म्हणाल्या.