मंत्रीमंडळ बैठकित महत्वाचे निर्णय

0
268

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक पार पडली. या बैठकीस यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह उपस्थित होते. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्गमधील वन्यहत्ती समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धक्का तंत्र

ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना परिषदेवर उमेदवारी नाही

सुभाष देसाई मंत्री असल्यामुळे सहा महिने आमदारकी शिवाय मंत्री पदावर राहू शकतील

त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत