मंत्रीमंडळबैठकित चार सदस्यांचा प्रभाग निर्णय नाहीच

0
439

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग कऱण्याचा कोणताही ठोस निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बठकित झालेला नाही. राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तीन चा प्रभाग चार सदस्यांचा कऱण्याबाबत कुठलीच वाच्यता केलेली नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेत नवीन रचनेप्रमाणे १३९ सदस्य होणार होते, मात्र आजच्या निर्णयामुळे सदस्य संख्या १२८ कायम राहणार आहे.

राज्य मंत्रीमंडळ बैठकीत तीन सदस्यांचा प्रभाग चार चा करण्याचा निर्णय झाल्याच्या बातम्या बहुतांश माध्यमांनी दिल्या होत्या. शासनाचे प्रसिध्दीपत्र आल्यानंतर त्याबाबत सुस्पष्टता आली आहे.  

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत, जिथे निवडणूक प्रक्रीया सुरू झाली आहे तिथे १० मार्च २०२२ रोजी जी परिस्थिती होती तेथून पुढे कार्यवाही कऱण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. जिथे महापालिकांची मुदत संपली आहे तिथे पंधरा दिवसांत निवडणुका जाहीर कऱण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. यापुढील काढात ज्या महापालिकांच्या निवडणुका असतील तिथेच सुधारीत नियमानुसार निवडणूक घेण्याचेही निर्देश दिले होते. त्यामुळे तीन सदस्यांच्या प्रभाग रचनेबाबत हरकती, सुचना, सुनावणी घेऊन अंतिम स्वरुपही देण्यात आले तसेच नवीन मतदार यादीची प्रक्रीयाही पूर्ण कऱण्यात आली आहे.