मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी १२ किंवा १३ जुलै रोजी

0
398

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने नुकतीच बहुमत चाचणी पूर्ण केली. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाला आता विस्ताराचे वेध लागले आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम १२ किंवा १३ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि त्यानंतर १८ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार आहे. या दोन्हीतील मुहूर्त साधत अधिवेशनापूर्वी या नव्या मंत्र्यांना पदभार स्विकारावा लागणार असल्याची चिन्ह आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी शिवसेनेत आजवरची सर्वात मोठी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कामय ठेवत बहुमत चाचणी घेण्यास सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. दरम्यान, नव्या मंत्रीमंडळात (Bjp) भाजपचे २५ ते ३० मंत्री तर एकनाथ शिंदे गटाचे १४ ते १५ मंत्री असतील असे बोलले जात आहे. या संभाव्य मंत्र्यांची नावे देखील समोर येत आहेत.

भाजपचे संभाव्य मंत्री..
भाजपच्या मंत्रीमंडळातील संभाव्य आमदारांची नावे समोर येत आहेत, यात प्रामुख्याने गणेश नाईक, रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, संजय कुटे, मदन येरावार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संदीप धुर्वे, रणजीत सावरकर, अतुल सावे, संभाजी निलंगेकर, राणा जगजीतसिंह पाटील, मेघना बोर्डीकर,चंद्रकांत पाटील, राहुल कुल, महेश लांडगे, जयकुमार गोरे, राम सातपुते, रणजीत मोहिते पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर,गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे यांचा समावेश होऊ शकतो.

शिंदे गटातून यांची नावे चर्चेत –
तर शिंदेगटातून स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह अनिल बाबर, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, तानाजी सावंत, दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, सदा सरवणकर, प्रकाश अविटकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शहाजी बापू पाटील, बच्चू कडू, भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, लता सोनवणे, मंजुळा गावीत यांच्या नावांचा देखील विचार होऊ शकतो.