मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीला यश

0
348

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधी आता १०० कोटींवर

मुंबई, दि.९ (पीसीबी)- आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेंतर्गत स्‍वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीच्या व्याजातून ज्‍येष्‍ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना राबविण्यात येते.या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात यावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या निधीत ५० कोटींची भर घालण्यात आल्‍याची घोषणा आज अर्थसंकल्‍पात केली आहे.यामुळे ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निवृत्‍तीवेतन मिळणे अधिक सुकर होणार आहे.आजच्या या घोषणेमुळे हा निधी आता १०० कोटींपर्यंत पोहोचला आहे.अर्थव्यवस्‍थेसमोर मोठे आव्हान असतानाही ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निधी उपलब्‍ध करून दिला.