दि ६ मे (पीसीबी ) – हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसमधील लढत लक्षवेधी ठरत आहे. या मतदारसंघात भाजपने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी देत मोठी खेळी खेळली आहे. कंगनासमोर काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कंगनाकडून व्यक्त केला जात आहे. पण विजय झाल्यानंतर अभिनयातील करिअर सुरूच ठेवणार का, याबाबत कंगनाने मोठी घोषणा केली आहे.
राजकारण की अभिनय याबाबत कंगना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बॉलीवूड क्वीन म्हणून नावारुपाला आलेल्या कंगनाने निवडणूक जिंकल्यास अभिनयाला रामराम ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत तिने ही घोषणा केली आहे.
अभिनयातील करिअरवर बोलताना कंगना म्हणाली, लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर अभिनयाची जगतातून हळू-हळू लांब जाऊ शकते. कारण एकावेळी मला एकाच कामावर फोकस करायला आवडेल. मी चित्रपटांमध्ये अभिनय करते, दिग्दर्शन करते. पण राजकारणामध्ये लोक माझ्याशी जोडले जात असल्याचे जाणवले तर मी राजकारणचं करेन











































