मंगळसूत्र चोरणाऱ्यास महिलेने पकडले

0
190


चिखली, दि. २० (पीसीबी) : मंगळसूत्र हिसकावणाऱ्याला पकडून महिलेने पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. ही घटना बुधवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास साने चौक, चिखली येथे घडली.

भिमा शामराव जाधव (वय २५, रा. भिमशक्‍तीनगर, मोरेवस्‍ती, चिखली) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कृष्‍णबाजार भाजीमंडई येथे भरलेल्‍या यात्रेमध्‍ये गेल्‍या होत्‍या. रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास त्‍यांच्‍या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. मात्र प्रसंगावधान राखत महिलेने चोरट्याला पकडून पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.