भ्रष्टाचारी खासदार धीरज साहू यांचा पुतळा जाळला

0
224

पिंपरी,दि.११(पीसीबी) – झारखंड राज्यातील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटींची बेहिशोबी रोख मालमत्ता सापडली आहे. काँग्रेस पक्षाच्या या भ्रष्टाचारी खासदाराच्या विरोधात आज सोमवारी (दि.११):सकाळी 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले आणि या भ्रष्टाचारी खासदार धीरज साहू याचा पुतळा जाळण्यात आला.

भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सुजाता ताई पालांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला वैशाली खाडे, कविता हिंगे, सुप्रिया चांदगुडे, दिपाली करंजकर, पल्लवी मारकड, रोहिनी रासकर, सीमा चव्हाण, अलका मकवाना, रेखा काटे, जयश्री मकवाना, विमल काळभोर, कोमल शिंदे, कमलेश बरवाल, निता कुषारे, त्याच बरोबर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मांगोडेकर, गणेश ढाकणे, देवदत्त लांडे, विजय शिनकर, मुकेश चुडासमा, दिपक भंडारी, अमेय देशपांडे, संजय परळीकर, आझाद शेख, संतोष तापकीर, आदी सर्वजण उपस्थित होते.