भोसरी, वाकडमध्ये दोन चोऱ्या

0
367

वाकड, दि. १० (पीसीबी) – एमआयडीसी भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआयडीसी भोसरी परिसरातील एका कंपनीच्या गेट समोरून दुचाकी तर कस्पटे वस्ती वाकड येथे घरफोडी झाली आहे.

सचिन कांतीलाल रणपिसे (वय 30, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी इंडस्ट्रियल मिनरल्स अँड रिफॅक्टरीज कंपनी या कंपनीच्या गेटसमोर मंगळवारी रात्री नऊ वाजता पार्क केली. अवघ्या अर्ध्या तासात त्यांची दुचाकी चोरीला गेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

प्रवीणकुमार कृष्णा कांबळे (वय 38, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर मंगळवारी (दि. 6) दुपारी अडीच ते गुरुवारी (दि. 6) सायंकाळी साडेपाच वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातून 32 हजार 600 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.