भोसरी मधील उड्डाणपुलाखाली सापडले स्त्री जातीचे अर्भक

0
257

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – भोसरी मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली स्त्री जातीचे अर्भक आढळले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 28) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आला.

याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश साबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या खाली अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर पार्किंग मध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळले. माहिती मिळाल्यानंतर भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. त्यास रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार या अर्भकाचा जन्म लपवण्याच्या हेतूने त्यास टाकून दिल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.