भोसरी पोलिसांनी 17 मोबाईल केले मूळ मालकांना परत

0
428

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – विविध गुन्ह्यात गहाळ झालेले 17 मोबाईल फोन शोधून भोसरी पोलिसांनी मूळ मालकांना परत केले.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेले 17 मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषाणाद्वारे मोबाईल फोनचा शोध घेऊन भोसरी पोलीस चोरी झालेल्या मोबाईल पर्यंत पोहोचले. वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 17 मोबाईल फोन पोलिसांनी शोधले.

21 मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना बोलावून त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन त्यांना परत करण्यात आले. आपला गहाळ झालेला मोबाईल फोन मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. तसेच भोसरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.