भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मनसे लढणारमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली.

0
83

दि ७ जुलै (पीसीबी ) – आगामी विधानसभा निवडणुकीचा काळ जवळ आला आहे, त्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक बांधणी करतानाच, पक्षाच्या विविध अभियानांशी, आंदोलनाशी, नागरिकांना कशाप्रकारे जोडता येईल, याची नियोजनपूरक चर्चा झाली. तसेच नुकताच झालेल्या लोकसभेत अनेक मतदारांना कागदोपत्री गोंधळामुळे मतदानात अडथळे निर्माण झाले होते. ते पाहता नवमतदार नोंदणी अभियान जास्तीत जास्त प्रभावीपणे राबविण्याबाबतही नियोजन आखण्यात आले.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा पिंपरी, चिंचवड, भोसरी, या पूर्ण ताकतीने लढवण्याच्या निश्चय केलेला असून तिन्ही विधानसभेमध्ये पक्षातील पदाधिकारी इच्छुक आहेत तसेच अन्य पक्षातील ही माजी नगरसेवक पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत, या संदर्भातही चर्चा झाली. तसेच येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर, तिन्ही विधानसभेमध्ये मेळावे, मतदार नोंदणी व शहरातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्येवरती पक्षाच्या वतीने मोठे आंदोलने करण्याचे नियोजन केलेले आहे. तसेच मा‌ राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पिंपरी, चिंचवड, व भोसरी, या तिन्ही विधानसभेमध्ये एक निरिक्षक पाठवलेले असून उमेदवाराचा,व पक्षाचा अहवाल लवकरच साहेबांना पाठवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, त्याप्रमाणे जे इच्छुक आहेत त्यांचा कार्य अहवाल लवकर सादर करण्याची विनंती करण्यात आली असून .

या तिन्ही विधानसभेमध्ये प्रामुख्याने पक्षाकडून इच्छुक उमेदवार असून तिन्ही विधानसभेमध्ये अन्य पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधलेला असून प्रामुख्याने चिंचवड व पिंपरी विधानसभेमध्ये माजी नगरसेवक व नगरसेविका लवकरच मनसेच्या उमेदवारी वरती उभे राहण्यासाठी पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत असून योग्य वेळी त्यांचे नाव जाहीर केले जाईल.
निवडून येण्याचा निकष व सर्वसामान्य नागरिकांमधील प्रतिमा यावरती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे काम तळागाळामध्ये पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी बैठकीमध्ये करण्यात आली. लवकरच तिन्ही विधानसभेमध्ये मेळावे पदाधिकारी, वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर, तसेच मतदान नोंदणी राबवण्याचे नियोजन केलेले आहे.
सदर बैठकीत शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष अध्यक्ष बाळा दानवले, राजू साळवे, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष दत्ता देवतारासे, भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर, महिला सेना शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, तसेच सर्व मनसेचे पदाधिकारी या बैठकीला मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.