दि.०६(पीसीबी)-भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विधानसभा मतदारसंघातील भोसरी धावडे वस्ती, चक्रपाणी वसाहत प्रभाग क्रमांक ६ चे अनुसुचित जमातीचे म्हणजे एसटी प्रवर्गाचे आऱक्षण आता पिंपरी विधानसभेतील दापोडीकडे जाणार आहे. प्रभाग रचनेतील काही बदलामुंळे लोकसंख्येच्या प्रमाणात एसटी प्रवर्गाची टक्केवारी बदलली आणि हे आरक्षण आपसूक दापोडीकडे वर्ग होणार आहे. भोसरी धावडे वस्ती, चक्रपाणी वसाहत प्रभाग ६ मधील एसटी प्रवर्गासाठी आता दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी प्रभाग क्रमांक ३० मध्ये जागा होणार आहे. दापोडीत एससी आणि एसटी अशी दोन्ही आरक्षण पडणार असल्याने तिथे खुल्या प्रवर्गातील जागेवर जे कोणी इच्छुक आहेत त्यांना फटका बसणार आहे.