भोसरी, दि. 06 (पीसीबी) : भोसरीच्या भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे आता भाजपला पुन्हा एकदा धक्का मानला जात आहे. आज यमुना नगर येथील सीझन ब्लॅंकेट हॉलमध्ये महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात माजी नगरसेविका सारिका लांडगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये केला.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहेर, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे, सुलभा उबाळे ,रवी लांडगे, माजी नगरसेविका प्रियंका बारसे ,विनया तापकीर, संगीता ताम्हाणे आदी मान्यवर तसेच महाविकास आघाडीचे नेतेमंडळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.












































