भोसरीत धान्य देण्याच्या बहाण्याने महिलेचे दागिने पळवले

0
156

भोसरी , दि. २९ -धान्य देण्याच्या बहाण्याने महिलेला घेऊन जात तिच्या गळ्यातील दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर धान्य आणतो म्हणून चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास दिघी रोड, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दिघी रोडने जात असताना दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्यांनी फिर्यादीस धान्य देतो असे सांगून एका ठिकाणी नेले. तिथे फिर्यादी यांना त्यांच्या गळ्यातील दागिने काढून एका पिशवीत ठेवण्यास सांगितले. दागिने काढून ठेवण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी हातचलाखीने दागिने काढून घेतले. त्यानंतर धान्य आणून देतो असे सांगून आरोपी पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.