भोसरीत गाड्यांची तोडफोड करत नागरिकांना लुबाडले

0
419

कासारवाडी, दि. १६ (पीसीबी) – दोन टवाळखोरांनी गाड्यांची तोडफोड करत तेथील रिक्षा चालक व इतर वाहतूक व्यावसायीकांना लुबाडल आहे. हि घटना कासारवाडी येथे बुधवारी (दि.14) येथे रात्री घडली आहे.

याप्रकऱणी सुभाष बबन टोपे (वय 47 रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) फिर्याद दिली असून पोलिसांनी अमित बाळासाहेब पिसाळ (रा. कासारवाडी) व कौशल बाळासाहेब पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये येऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दगडाने गाड्याच्या काचा फोडल्या, तर फिर्यादी यांच्या खिशातून 1 हजार 700 रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच तेथील एका रिक्षाच्या गल्ल्यातून ही 475 रुपये काढून घेतले. या घटनेमुळे परिसरात दहशतीच वातावणरण असून अद्याप भोसरी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.