भोसरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरीत कंपनी ला भीषण आग लागली आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले.
उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये बंद कंपनीचे डीमॉलिश करण्याचे काम सुरू असताना अचानक आग लागलीय या आगीत एक जण गंभीर जखमी झालाय. भोसरी येथील लांडेवाडी परिसरातील औरा आईस आणि कोल्ड स्टोरेज या कंपनीचे डीमॉलिश करण्याचं काम सुरू असताना ही आग लागलीय. या आगीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला वाय सी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वेळीच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या बंद कंपनी मध्ये गॅस कटिंग करताना कोल्ड स्टोरेजच्या फोम ला आग लागली आणि तिने लागोलग पेट घेतला सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.












































